सांड कि आंख :
सांड कि आंख : बुढापा जवानिसे कम है के। तन बुढां होवे है ,मन नही ,के!।। LIFE BEGINS AT 60 शिक्षणास वयाचे बंधन नसते : Education is age neutral हे सिद्ध करणारा सिनेमा सांड कि आंख. चकदे,सुरमा ,गोल्ड, दंगल ,पानसिंग तोमर,व पूर्वी आलेला नाचे मयुरी,मेरी कोम, भाग मिल्खा असे अनेक उत्तम बिओपिक आपल्याकडे बनले गेलेत ,त्यात मानाचं स्थान मिळवणारी आणखी एक उत्तम फिल्म.3 idiots सारखी हसता हसता डोळे ओलावून टाकणारा चित्रपट. पान सिंग तोमर नंतर आणखीन एक नव्हे दोन तोमर त्याही साठी ओलांडल्यावर 'प्रकाशा'त आलेल्या 'चंद्रा'सम शीतल पण करारी जावा असलेल्या 'चंद्द्रा' व 'प्रकाशा तोमर 'या हरयाणातील बागपतच्या जोहरी गावातील दोन जवान म्हाताऱ्या शार्प शूटर्स ज्यांनी आज 88 व्या वर्षापर्यंत ( 60 नंतर ) अनेकानेक दोन हांडे भरून मेडल्स मिळवली ती मिळवली पण 50000 तरुणांना आकर्षित केले,स्फूर्ती व प्रेरणा दिलीय. त्या शार्प शूटर का व कश्या झाल्या व त्यांना आलेल्या अडचणींवर कृष्ण चाणक्य नीतीने कशी मात केली याची हि कहाणी . असं म्हणतात TO BE IS TO BE RELATED. आणि खरंच मी माझे अनेक विद्यार्थी त...