नाळ: देविकीच्या त्यागाची ,यशोदेच्या दुधाच्या दुविधेत अडकलेल्या बालकृष्णाच्या तळमळ व समतोलाची भावविश्वाची आधुनिक हळुवार चित्रकथा.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2393382384010758&id=100000170606055
Mo(Re)vie(w):
नाळ: देविकीच्या त्यागाची ,यशोदेच्या दुधाच्या दुविधेत अडकलेल्या बालकृष्णाच्या तळमळ व समतोलाची भावविश्वाची आधुनिक हळुवार चित्रकथा.
शिवंजय डॉ संजय होनकळसे©
नदीच्या काठी वसलेल्या एका लहान खेडेगावात चित्रपटाची गोष्ट घडते. अंदाजे आठ वर्षांचा चैतन्य (श्रीनिवास पोकळे) हाच या सिनेमाचा नायक. चैतन्यचे वडील (नागराज मंजुळे) गावातील जमीनदार आहेत. चैतन्य आपले वडील, आई (देविका दफ्तरदार) आणि आपल्या आजीसह गावात राहत आहे. गावात दोस्तमंडळींच्या साथीने मस्त हुंदडत आहे. कोंबड्यांशी खेळत आहे, शेतात-जंगलात बागडतो. गोठ्यातल्या म्हशींसोबत रमतो. जवळच असलेल्या गावातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकत असतो अगदी ग्रामीण भागात आजही अनुभवायला येणाऱ्या ग्रामीण जीवनाचा तो मस्त आनंद लुटतअसतो .त्याचं भावविश्व चितारण्याला लेखक-दिग्दर्शकाचे प्राधान्य आहे. त्याच्या आयुष्यात एकदम एक‘वादळ’ येतं.
सुंदर अभिनय साऱ्यांचाच सर्वांवर मात करतो तो चैतन्य झालेला श्रीनिवास पोकळे बाळकृष्णाच्या भावविश्वातील बारीक बारीक दुवे व बारकावे दाखवतो ,देवकी व दीप्ती वास्तवापेक्षा साधा make up मध्येच छान दिसतात.सशक्त स्क्रिप्ट व पदार्पणातील सशाजत व नेटके दिग्दर्शन ,मंजुळेचे संवाद व संगीत नेमलेकरांचं सारेच मस्त मस्त ।तर आडे हे देवकीचा त्याग ,यशोदेच्या दूध व जरीशनच भावविश्व लहान थोर सर्वानाच भावेल
'शिवंजय ':डॉ संजय होंनकळसे©
shivanjaydrsanjayhonkalse.com
Comments
Post a Comment