सुबोध भावे ...आणि काशीनाथ घाणेकर:दोघेही अप्रतिम.
सुबोध भावे ........
आणि काशीनाथ घाणेकर:दोघेही अप्रतिम.
https://goo.gl/images/EHkWZZ
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2393555940660069&id=100000170606055
Mo(Re)vie(w):
सुबोध भावे ........
आणि काशीनाथ घाणेकर:दोघेही अप्रतिम.
अखेर मराठी चित्रपट व सुबोध भावे या माध्यमातून मोठे नाव असलेल्या 500 कोटी चित्रपटास टक्कर देणारा मराठी चित्रपट म्हणून ..आणि काशिनाथ या चित्रपटाची सिनेजगताच्या इतिहासात नोंद होईल.
या विषयावर चित्रपट व तोही नितांत सुंदर व त्यातून' ठग' सारख्या multistarrer व multi budget चित्रपटासमोर तो लावणे 14 15 शो मध्ये इनमीन एखांदा शो तोही अडनानीळ वेळेत मिळूनही या पट्ठ्याने 100 कोटींची मजल मारली व ठग ने तिकीट बारीवर डबल rateव 14 15 shows, 5000 स्क्रीन घेऊनही कशीबशी 140 कोटींची माया (बजेट 500 कोटी)जमवली.
पण बॉक्स ऑफिस च्या गणिताबरोबरच प्रेक्षक पसंतीची पावती हि महत्वाची .काशी नाथ घाणेकर हा रंगभूमीचारच वादळ व entry त टाळ्या व शिट्ट्या घेणारा पहिला सुपरस्टार ,बेधुंद कलाकार .त्याच्या नाट्यजीवनाचा मागोवा घेणारा ,पत्नी कांचन घाणेकर यांच्या 'नाथ हा माझा 'वर बेतलेला चित्रपट.सुबोध भावेनी ताकतीने उभा केलाय. 'बालगंधर्व' व 'कट्यार 'सोडता शरीरयष्टी सुयोग्य नसूनही लोकमान्य ,व काशीनाथ यांची नस त्यांनी अचूक पकडली (लोकमान्य मध्ये डोळे व अभिनय …या जोरावर तर येथे लकब व ढंग घेऊन इतकी बेमालूम कि काशीनाथच समोर उभा राहतो.( सुबोध यांचा काशिनाथसारखा बेमालूम व सहज अभिनय दाखवणारी क्लीप्प मुद्दामून येथे देत आहे ती पाहावी) सिनेमातील बेधुंद uncontrolled ,unwarranted खरा काशी नाथ मी जवळून पाहिलाय. रुपारेल महाविद्यालयाच्या सिल्वर ज्युबिली निमित्त आंम्ही गुंतताचे शोसलावले असताना मी past student Association चा सेक्रेटरी या नात्याने स्टेज वरच असे तेंव्हा .'अश्रू'तीळ लागल्याने तर तरुणाईला वेड लावलेले मी माझ्या तरुणाईत पाहिलंय. साऱ्यां कलाकारांचा सहज सुंदर अभिनय व character मधला सहज वावर अप्रतिम।
कांचंच काम करणारी वैदेही परशुरामी लाजवाबओढ लावणारी.
एकच खंत' नाथ ' बरोबरच इतर संशोधन करून त्याच्या बेफिकीर व unwarranted स्वबगावाचा मागोवा घेणारे प्रसंग घातले असते तर अवॉर्ड विंनिंग सिनेमा झाला असता अल्बत त्याशिवायही award चा भाग्य मिळवून देणारा हा चित्रपट आहे.
शिवंजय डॉ संजय होनकळसे©
shivanjaydrsanhayhonkalse.bligspot.com
Comments
Post a Comment