बदला

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2577831532232508&id=100000170606055

'Mo(Re)vie(w) :My Take :बदला
'बदला' लेनाभी हर वक्त सही नही होता ,पर माफ करना भी हर बार सही नहीं होता :.'shivanjay':$@π√∆¥.
Perception व illusion वर आधारित हा सिनेमा आहे कदाचित या आधी हिंदी पडद्यावर  या कन्सेप्टवर प्रयत्न झाला नाही दृष्यम थोडा फार जवळ जाणारा आहे.Perception Management हा माझा आवडता विषय ,तो मांडताना मी नेहमी दोन सिनेमांचा विचार व उदाहरण सांगत असे .एक मॅनेजमेंट  फिल्म Eye of the  Beholder (यांच नावाची एक 9 भागांची शॉर्ट फिल्म series पण आहे) व दुसरी फेमस जापनिज दिग्दर्शक अकिरा कुरुसावा चा सिनेमा 'राशोमान' (ज्यावर त्याच नावाचे नाटक अमोल पालेकरांनी बसवले होते 1985/ 86 मध्ये)
राशोमान मध्ये एक खून झालेल्याचे तीन प्रत्यक्षदर्शी असंतात ते तीन जण खुनाचा वृत्तांत त्यांच्या नजरेतून ,त्यांच्या समजूतीनुसार ,perceception ने देतात त्या तिघांच्या eye witnessचा वृत्तांत ते देतात तो वेगवेगळा असतो खून नक्की कुणी केला यावर चित्रपट काही भाष्य करीत नाही ये प्रेक्षकांवर दिग्दर्शक सोडतो,perception वर आधारीत हा एक अत्यंत सुंदर व दर्जेदार चित्रपट आहे.
बदला हा तेवढांच उत्कंठावर्धक व खिळवून ठेवणारा चित्रपट आहे .
बदला चित्रपट एका स्पॅनिश चित्रपटा चा (The Invisible Guest)चा remake आहे फक्त मुख्य पात्र हे बदलले आहे स्त्री पात्र आहे .अनेक ट्विस्ट आहेत फार विचारपूर्वक व ध्यान देऊन व ठेवून चित्रपट बघावा लागतो हेंच यांच्या यशस्वीतेचे गमक आहे ,फुल्ल मार्क दिग्दर्शक सुजोय याला.खरंतर दोन पात्रांच्या संवादातून चित्रपट perception व illusion द्वारा पुढे जातो व ते बोरिंग होऊ शकला असता पण दिग्दर्शक,अमिताभ व तापसी तसे होऊ देत नाहीत.एका माणसाचा खून होतो हॉटेल रूम मध्ये जिथे तापसी असते पण खुनी रूम मध्ये कसा येतो व तिला बेशुद्ध करून तिच्या मित्राचा खून करून कसा  जातो हे कोडे असते कारण रूम पूर्णपणे सुरक्षित व लॉक असते .बादल गुप्ता नावाचा एक निष्णात व यशस्वी वकील त्याच्या इंटररोगेशन साठी तापसी नेमते व त्यांच्या संवाद माध्यमातून चित्रपट पुढे जाऊ लागतो ती त्याला 6 दाखवते पण तो त्यातील लपलेला 9कसा शोधतो खुन्याची " बदला "बदल illusion व perception व लॉजिक द्वारे होते त्याची 'कहानी'(सुजयचा एक चित्रपट)आहे बदला.
अमिताभ फक्त बसून व उभा राहून सुंदर बेअरिंग व लाजवाब अभिनय ,तापसी ची भूमिका BR चोप्राच्या इत्तेफाक मधील नंदा सारखी भूमिकेला ती शोभते ,कमल करते ती अमृता सिंग ,टोनीलूक चा अभिनय छान तन्वीर घनी व डेंझीलं पण छान.उत्कृष्ट cinematography व लोकेशन्स.अशा चित्रपटांना रिपीट ऑडिअन्स नसतो तरी परत बघावा असा flaw लेस सिबेम ज्यांनी पहिल्या आठवड्यातच 42 कोटी कमाई केलीय  व housefull जातोय.महाभारताची अनॉलॉजि व द्रौपदीचा बदला याचा छान उपयोग.
'शिवंजय':$@π√∆¥
Pl leave your comments on:
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

The Tashkent Files

शरयू नदी: विष्णूचे प्रेमाश्रु:मराठी हिंदी

PARI,NOT A FAIRY TALE