मिशन मंगल ,बाटला हाऊस

Mo(Re)vie(w):My Take
Mission B(M)a(ng)tl(a) House
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2856345781047747&id=100000170606055

आजकाल बायोपिक व सत्य घटनांवर चलचित्र काढण्याची पद्धत रूढ होत आहे.जुलैमध्ये सुपर 30 च्या यशा नंतर स्वातंत्र दिनी एकाच दिवशी दोन चित्रपट प्रदर्शित झालेत.मिशन मंगल व बाटला हाउस.
दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झालेत व परस्पर विरोधी जॉनर असूनही विशेष साम्य असलेले आहेत.
दोन्ही चित्रपट एकाच दिवशी म्हणजे 15 आगस्ट ला प्रदर्शित झालेत.
दोन्ही चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहेत.
दोन्ही भारतीय सामाजिक परिस्थिती व सामाजिक मानसिकता या पार्श्वभूमीवर चित्रित आहे त्यामुळे चांगले काम करणाऱ्या होतकरू ,समाजिक भान व भारतीयता राखून काम करणाऱ्या व्यक्तींवर होणाऱ्या गळचेपी व अडचणी (फार छोटा शब्द आहे) दाखवणारी असून त्यावर मात करून आपले ध्येय साध्य करणारे हिरोज वर बेतलेल्या कथांवर आहे
त्यामुळे त्यांचे वैयक्तिक व संसारी आयुष्य डळमळीत होते  व त्यावर मात करून ते उभे राहतात.
दोन्ही सिनेमात व्यवसाया अंतर्गत असलेल्या हेवे दावे ,स्पर्धा  डिसेंटली दाखवलेत.
दोन्हीत नायक नायिका आपल्या मर्यादा सांभाळून काम करतात.
दोन्हींमध्ये offbeat काम करणाऱ्या real हिरोंच आयुष्य पण सामान्य व संघर्षपूर्ण असते हे दाखवलंय.
दोन्ही सिनेमात मुख्य पात्र ठराविक guilt घेऊन काम करतात(विद्या बालन - मिशन ,व जॉन -बाटला house)
दोन्ही सिनेमे 2013 सालात घडलेल्या घटनांवर बेतलेत
पण एकात technology (Space) हा विषय आहे तर एकात terrorism दोन्हीत deshi boys आहेत
एकात technology चा उपयोग गुन्हे करण्यास व त्यातून सही सलामत बाहेर पाडण्यास केलाय तर एकात Home technology(इंधन बचाव पुरी तंत्र व computer switch off on technique.)चा वापर करून कमी खर्चात जागतिक पातळीवरच यश मिळवता येत हे दाखवलंय.
दोन्ही सिनेमाच यश हे त्याची documentary न करता नीटपणे हाताळण्यात आहे .त्याच श्रेय निखिल अडवाणी (House) व R Balki ( क्रिएटिव्ह dierctor व writer - मिशन) व जगत शक्ती दिग्दर्शन मिशन याना जाते.उत्तम बांधणी व  पटकथा यात याच गमक आहे.
Batla house हा चित्रपट 2012 13 च्या Batla house,L18 वर झालेल्या encounter वर आधारित आहे तर मिशन मंगल 24 सप्टे 2013 ले उडालेल्या  MOM या मंगलयानावर आधारित आहे .

प्रेसेंटशन व भूमिका या बाबत मिशन बाजी मारून जाते . साऱ्यांनी आपआपल्या भुमिकांची नस मस्त पकडलीय .अक्षयची ACTING MATURE वाटते त्याने FAILURE स्वीकरणाऱ्या सायंटिस्टच  बेअरिंग उत्तम पकडलाय.विद्या बालन आता संजीव कुमारची जागा घेत आहे ,शरीर्यष्टीवर मात करून उत्तम भूमिका पार पडण्याचे संजीवी कसब तिने मिळवलंय व ते ती म्7रावत आहे .सोनाक्षी छान  तापसी ,नित्या व व कोल्हारी उत्तम, दत्तात्रेय शर्मन,गोखले सार्यानीच भूमिकेची आब राखलिय ,दलिप ताहीरचा रुपार्ट देसाई मुरब्बी.संजय कपूरच छान व चपखल उपयोग केलाय.
Batla त जॉन ,मृणाल कुशाण कुमार उल्लेखनीय.
एकंदरीत स्वातंत्रदिनी दोन Two in One treat देणारे चित्रपट  समय सार्थक ठरलेत.ISRO च्या 50 व्य वर्षाच्या सेलिब्रेशनची हि ट्रीट आहे.
©$@π√@¥ honkalse
shivanjaydrsanjayhonkalse. blogspot.com

Comments

Popular posts from this blog

The Tashkent Files

शरयू नदी: विष्णूचे प्रेमाश्रु:मराठी हिंदी

PARI,NOT A FAIRY TALE