घोंगडी पुराण

अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।। घोंगडी पुराण:एक पवित्र वस्त्र*
घोंगडी पुराण:एक पवित्र वस्त्र*
$@π√∆¥ #.
माझ्या कडे घरी आजही अत्यन्त दुर्लभ वस्तू ,सांसारिक व आध्यात्मिक उपयोगाच्या आहेत .मी स्वतः व माझ्या आईने जेष्ठ करून त्या मिकवल्या आहेत.
जसे जुन्या जमान्यातील पाटा वरवंटा (आठ आणे त्यावेळची किंमत),खलबत्ता, तांब्याचा बंब खेळण्यातील,चिनी मातीच्या बरण्या 20(3 रुपये ,आज 5000  व 7 kg 3000 आजची किंमत),गोधड्या ,लोखंडी खाट (जी बाळंतिणीस ऊब घाटायला अति उपयुक्त असते)तसेच घोंगडी .माझ्या आजच्या आधुनिक विद्यार्थ्यांना हे सारे बोझ वाटते .त्यांचे आधुनिक व विज्ञान निष्ठ असतील तर आनंद आहे .पण......? 
उदाहरणार्थ आजीच्या जमान्यापाससून अन्न वाया जाऊन द्यायचे नाही हे शिकवले जाई.अगदी वारं भात वितले तरी त्याचे थालीपीठ करून खाल्लं जाई हे आजचता fermented ,मैदायुक्त फास्ट food चवीने खाणार्यांना पटणं का मुश्किल जावं हे कळत नाही . मध ,तूप ,दारू जेवढी जुनी तेवढी उपयुक्त हे किमती जुन्या दारू घेऊन पिणाऱ्या आजच्या जॉनींना का वळत नाही.?
चीज ,पास्ता ,पिझ्झा खाणार्यांना शुद्ध तुपाच व जुनाट तुपाचे विविध महत्व का कळणं होतं.  माझ्याकडे एका बरणीत तूप ,लोणचे ,आंबा फोडी आहेत ज्याचं पाक गुळाचा आळला आहे त्यास बुरशी समजून नाक मुरडली जातात व हि मुले कधी गप्प बसतात ,कधी या वासू फेकून देतात तर कधी माझ्या मागे आपसात हे किती वाईट आहे ,सरांना आता जमत नाही म्हणत बसतात .
ज्या अमेरिकेने गेल्या शतकातील दुसऱ्या दशकात फक्त lobbying मुळे वनस्पति ,sunflower ऑइल चा प्रसार प्रचार केला तूच अमेरिका आता तुपाचा महत्व जाणते .विज्ञानाचा सामना फक्त वेदांशी च होतो कुराण ,बायबलशी नाही  हेही आधुनिक जग स्वीकारत असताना ,आपके सण वार व्रत वैकल्य हे अत्त्यांतीक शास्त्रोक्त आहे ,अगदी जन्म मारणापार्यंत ,हे या corona  काळाने सिद्ध केलेय तरी आपल्या या सर्व बाबींची चेंस्टा करण्यात व हसवणुकीत आजचे आधुनिक वीर पूढे असतात .
आज या पिढीस या सर्व  बाबी कळणे अति महत्वाचे आहे .पण नको त्या गोष्टींचे अवाजवी कौतुक ,आजची पालक पिढीच  करताना दिसते हे दुर्दैव! जवळची माणसेही ऐकत नाहीत व दूरची फायदा घेऊन जातात तेही पटणं कठीण जातं.
म्हणून मी कर्तव्य भावनेने यावर लिखाण करून हसं करून मूर्ख बनत राहतो म्हणून आज माझट घरील घोंगडी पाहून त्यावर हे भाष्य:घोंगडी पुराण
 "वीर्यस्पृष्टं शवस्पृष्टं स्पृष्टं मूत्रपुरीषयोः । रजस्वलादिसंस्पृष्टमाविकन्तु न दुष्यति ।।"
आविक म्हणजे घोंगडी वस्त्रास वीर्य,प्रेत,मल,मूत्र व रजस्वला यांचा स्पर्श झाला तरी ते वस्त्र दूषित होत नाही असे शास्त्र वचन आहे.
*धार्मिकदृष्ट्या पूर्वीपासून घोंगडीचे महत्व:*
प्रत्येक साधकाकडे घोंगडी असणे गरजेचे असते कारण करत असलेल्या साधनेला उच्च स्थरावर घेऊन जाते.
पूर्वीध्यानधारणा,धार्मिक अनुष्ठान यासाठी घोंगडी वापराला अनन्य साधारण महत्व होत.तसा उल्लेखही पूर्वीचा माहितीतआढळतो. स्वतः शिव मल्हारांचा पेहरावा मध्ये घोंगडीचा वापर होता. 
अध्यात्मिक साधना,ध्यान-धारणा,योग व मंत्राचे अनुष्ठान यासाठी असलेले घोंगडीचे महत्व हे ऋषींनी व संत महात्म्यांनी पुराण काळापासून वर्णलेले आहे. शरीरातील उर्जा,तापमान नियंत्रित राहत असल्याने घोंगडीवर केलेल्या साधनेने अत्युच्च मानसिकसमाधान मिळते.श्री गुरुचरित्र,श्री गुरुलीलामृत,श्री गजानन विजय,श्री साईं सत्चरित्र, श्री दुर्गा सप्तशती व इतर सर्व आध्यात्मिक साधना व मंत्रांच्या अनुष्ठानासाठी घोंगडीचा उपयोग करावा.
 वारकरी संप्रदाय मध्येही घोंगडी वापरला अत्यंत महत्व आहे. पितृदोष असणाऱ्यांनी काळे घोंगडे दान करावे कारण घोंगडे दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे पितृदोष असणाऱ्यांना. महालक्ष्मी पूजनासाठी सुद्धा घोंगडे वापरले जाते.

*घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे-*

▪️पाठदुखी, कंबरदुखी, वात, सांधेदुखीमध्ये यांपासून                 आराम मिळतो. यामध्ये जेण (घोंगडीचाच एक जाड         प्रकार) वापरणे जास्त योग्य ठरते.
▪️झोप येत नसणार्‍यांसाठी तर हे एक उत्तम औषधच आहे घोंगडीवर झोपल्याने शांत झोप लागते.
▪️उच्च रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते.
▪️कांजण्या, गोवर, तापातही घोंगडीचा वापर करतात.
▪️घोंगडीवर झोपल्याने लहान मुलांचा अस्थमा दूर होतो. .
▪️हिवाळ्यात ऊब तर उन्हाळ्यात थंडावा देते.
▪️घोंडीवर झोपल्याने साप, विंचू, मुंगी, गोम, मधमाशा, ढेकूण जवळ येत नाहीत.
▪️अर्धांगवायूचा धोका टळतो..आणि मधुमेह कमी होण्यास मदत होते.
 🙏

Comments

Popular posts from this blog

The Tashkent Files

शरयू नदी: विष्णूचे प्रेमाश्रु:मराठी हिंदी

PARI,NOT A FAIRY TALE